16-08-2017 - 16-08-2017

"नारायण गड स्वच्छता अभियान" दि. १६/०८/२०१७ रोजी रोटरी क्लब नारायणगाव, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी९ वा. पासुन नारायणगड स्वच्छता अभियान सुमारे ३२० विद्यार्थांमार्फत राबाविण्यात आले. या कार्यात वनविभाग जुन्नर - श्री म्हसे सर व कर्मचारी आणि श्री. विनायक खोत अध्यक्ष शिवाजी ट्रेल व सहकारी यांच्या समवेत खोडद गावातील गावक-यांन्नी देखील सहभाग नोंदविला. वन विभाग व शिवाजी ट्रेल हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहीती याठिकाणी विद्यार्थांन्ना देण्यात आली. या उपक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत आवटे महाविघालय मंचर, मंगरूळ पारगाव, बेल्हे, व बोरी येथिल महाविद्यालयांन्नी देखिल सहभाग नोंदविला. विद्याथ्र्यांचा उत्साह द्विगुणीत झाला व वनभोजनाचा आनंद देखिल घेतला दु १ वा कार्यक्रमाची सांगता गडाच्या पायथ्याशी होत असताना रो.डॉ. लहु गायकवाड व डॉ प्रोफे फुलसुंदर यान्नी लिहिलेल्या "नारायणगड" या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायणगड" या पुस्तकाच्या २५० प्रतिंचे मोफत वाटप विद्यार्थांन्ना करण्यात आले. आदरणीय रो ब्रम्हे काका, रो शेवाळे सर व अध्यक्ष या नात्याने मी मुलांन्ना ऐतहासीक वास्तुचे जतन, जीवनातील स्वच्छतेचे व शिस्तिचे महत्व पटवुन देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रो प्रोफे. डॉ. लहु गायकवाड व प्रोफे. फुलसुंदर सर यांन्नी केले. रोटरी क्लब नारायणगाव च्या वतीने सर्व विद्यार्थांन्ना अल्पोपहार देण्यात आला.

Project Details

Start Date 16-08-2017
End Date 16-08-2017
Project Cost 5000
Rotary Volunteer Hours 6
No of direct Beneficiaries 320
Partner Clubs
Non Rotary Partners Gramonnati mandal's arts, Commerce and Science college
Project Category Club Thrust Area